राहुल गांधींचं मातृप्रेम, भारत जोडो यात्रेमध्ये आईसाठी बनले श्रावण बाळ; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:37 PM2022-10-06T12:37:45+5:302022-10-06T12:46:23+5:30
गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारी पासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारी पासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी कर्नाटकातील मंड्या येथे 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांसोबत 'भारत यात्रा'काढली.या यात्रेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यादरम्यान, राहुल गांधी खाली वाकून आई सोनिया गांधी यांच्या शूजची लोस बांधताना दिसले. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना 'माँ' अशी कॅप्शन दिली आहे.
राहुल गांधी यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या पदयात्रेतील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. गांधी सर्व सामान्य जनतेत जाऊन लोकांना भेटत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांचे पावसातील भाषणाचा फोटो व्हायरल झाला होता.
मां ❤️ pic.twitter.com/0UgqF9hfw6
— Congress (@INCIndia) October 6, 2022
सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील डाक बंगला परिसरातून पदयात्रेला सुरुवात केली होती. सोनिया गांधी पहिल्यांदाच 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभाग घेतला. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका काही महिन्यांनी होणार आहेत, या पार्श्वभूमिवर सोनिया गांधी यांची मंड्यातील ही पदयात्रा देवेगौडा कुटुंबीयांचे वर्चस्व असलेले क्षेत्र मानल्या जाण्याच्या दृष्टीनेही लक्षणीय आहे.
Noru Cyclone: नोरू चक्रीवादळ घोंगावणार; महाराष्ट्रासह देशातील २० राज्यांना येलो अलर्ट जारी
"सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल. राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली होती. हल्ली ही पदयात्रा कर्नाटकात आहे. या यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होईल. या यात्रेत एकूण ३,५७० किमी अंतर कापले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली.