Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 09:48 AM2019-10-31T09:48:41+5:302019-10-31T10:04:53+5:30
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे.
नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 35 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींच्या 35 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
#Delhi: Congress Interim President Sonia Gandhi and Former PM Manmohan Singh pay tribute to former PM Indira Gandhi at Indira Gandhi Memorial on her death anniversary. pic.twitter.com/ylooFvK4L3
— ANI (@ANI) October 31, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'आजीने मला खूप काही शिकवलं. पोलादासारखे मजबूत उद्दिष्ट आणि निडरपणे घेतलेले निर्णय हे प्रत्येक वेळी मला मार्गदर्शन करतात' अशा शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडील जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. शास्त्री यांच्या निधनानंतर त्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींना 1971मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. एक कणखर नेत्या, 'आयर्न लेडी' म्हणून इंदिरा गांधींचा जगभरात लौकिक आहे. आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांसारखे धाडसी निर्णय इंदिरा गांधींच्याच काळात भारताने घेतले होते. त्यामुळे अनेक कठोर प्रसंगांना इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले होते. मात्र, इंदिराजींच्या याच धाडसी बाण्याचे कौतुक अनेक वर्षं होत आहे.
आज मेरी दादी श्रीमती इन्दिरा गांधी जी का बलिदान दिवस है। आप के फौलादी इरादे और निडर फैसलों की सीख हर कदम पर मेरा मार्गदर्शन करती रहेगी। आपको मेरा शत् शत् नमन।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 31, 2019
My tributes to my grandmother & former PM, Smt Indira Gandhi Ji on the anniversary of her martyrdom.
#IndiraGandhipic.twitter.com/xqdqgQlu6H
इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हटलं जातं.
देश की पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी को उनकी पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2019
Former PM Dr. Manmohan Singh & Congress President Smt. Sonia Gandhi pay their respects to Smt. Indira Gandhi on her martyrdom day at Shakti Sthal. #IndiasIndirapic.twitter.com/pIytHetl6Q
— Congress (@INCIndia) October 31, 2019