गुजरात-हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी समर्थकांकडून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर हवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 08:25 AM2017-12-18T08:25:08+5:302017-12-18T09:50:29+5:30
गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना
नवी दिल्ली - गुजरात व हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. गुजरातमधील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार येईल, असा अंदाज सर्वच संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान, दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा, यासाठी समर्थकांकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर हवन करण्यात येत आहे.
निकालांआधीच भाजपाकडून जल्लोषाची तयारी
तर दुसरीकडे, गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपाने मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच जल्लोषाची तयारी सुरु केली होती. रविवारी (17 डिसेंबर ) रात्री भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध दावे करण्यात येत होते. तर दुसरीकडे भाजपाने मतमोजणीपूर्वीच मुंबईमध्ये विजयाचे पोस्टर्सही लावले होते. गुजरातमध्येही रविवारी रात्रीच भाजपाकडून विजयाची तयारी पूर्ण केली होती.
#GujaratElection2017 Postal ballot counting underway; visuals from a counting center in #Vadodarapic.twitter.com/O1ZP9JuLSk
— ANI (@ANI) December 18, 2017
Supporters perform 'Hawan' outside Congress President Rahul Gandhi's residence in #Delhi ahead of counting of votes, set to begin shortly #GujaratElection2017#HimachalPradeshElectionspic.twitter.com/rv5bfsiIa2
— ANI (@ANI) December 18, 2017
#GujaratElection2017 Postal ballot counting underway; visuals from a counting center in #Suratpic.twitter.com/J6uLCbjGxo
— ANI (@ANI) December 18, 2017
#UttarPradesh Supporters perform 'Havan' in #Varanasi as counting of votes continues for Gujarat and Himachal Pradesh assembly elections pic.twitter.com/V5yOEgOo71
— ANI UP (@ANINewsUP) December 18, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले आहे. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावाकरण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. अहमदाबादस्थित एका कंपनीचे 150 अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट आहे. देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, असा आरोप हार्दिक पटेल याने केला आहे. दुसरीकडे भाजपाचेच पुण्यातील सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिल, असं संजय काकडे म्हणाले आहेत.
EVMs opened at a counting centre in Shimla's Kasumpati as counting of votes continues #HimachalPradeshElectionspic.twitter.com/rsid3L2xgd
— ANI (@ANI) December 18, 2017