Lok Sabha Chunav 2024:  'लिहून ठेवा 2024 च्या निवडणुकीत PM मोदींचं सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही...' बड्या नेत्याचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:15 PM2023-03-25T13:15:11+5:302023-03-25T13:21:39+5:30

"भाजप आमच्या कुटुंबातील सदस्यांना कशा प्रकारे निशाणा बनवत आहे, हे लोक पाहत आहेत."

Tej pratap prediction bjp will not repeat history in lok sabha election 2024 says narendra modi chair will shake | Lok Sabha Chunav 2024:  'लिहून ठेवा 2024 च्या निवडणुकीत PM मोदींचं सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही...' बड्या नेत्याचा दावा!

Lok Sabha Chunav 2024:  'लिहून ठेवा 2024 च्या निवडणुकीत PM मोदींचं सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही...' बड्या नेत्याचा दावा!

googlenewsNext

बिहारचे पर्यावरण मंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी देशाच्या राजकारणासंदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी ज्या सिंहासनावर बसले आहेत ते सिंहासन हालल्याशिवाय राहणार नाही, असे तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व गेले. यानंतर तेज प्रताप यांनी हे भाष्य केले आहे.

नरेंद्र मोदी यांचे सिंहासन हालणार -
तेज प्रताप म्हणाले, '2024 मध्ये आपला केंद्रातून सफाया होणार, हे भाजपला माहीत आहे. मी भविष्यवाणी करत आहे की, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंहासन हालणार.' ते पुढे म्हणाले, देशात भाजपने हुकूमशाहीचा पर्याय निवडला आहे. राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने लोकसभेतून अपात्र घोषित करण्यात आले, ते अयोग्य आहे. 

भाजप सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे लागला आहे. मात्र जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईल. भाजप आमच्या कुटुंबातील सदस्यांना कशा प्रकारे निशाणा बनवत आहे, हे लोक पाहत आहेत. ते विरोधकांच्या ऐक्याला घाबरतात, त्यामुळेच विरोधी नेत्यांना निशाणा बनवत आहेत, असेही तेज प्रताप म्हणाले.

काँग्रेस आमदार शकील अहमद म्हणाले, भाजप विरोधकांच्या ऐक्याला घाबरते. 2024 मध्ये ते सत्तेवरून पायउतार होणार, हे त्यांना माहीत आहे. यामुळेच ते राहुल गांधींसारख्या नेत्याला निशाणा बनवत आहेत. 

Web Title: Tej pratap prediction bjp will not repeat history in lok sabha election 2024 says narendra modi chair will shake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.