'महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये AIMIM ने...', तेलंगणातून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:54 PM2023-10-19T21:54:26+5:302023-10-19T21:55:34+5:30

Telangana Assembly Election: तेलंगाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

telangana-election-2023-rahul-gandhi-slams-kcr-brs-bjp-pm-modi-asaduddin-owaisi | 'महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये AIMIM ने...', तेलंगणातून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

'महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये AIMIM ने...', तेलंगणातून राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

Telangana Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) राज्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR), असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला.

कमलानगरमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, "एका बाजूला काँग्रेस आहे आणि दुसऱ्या बाजूला भारत राष्ट्र समिती (BRS), भाजप आणि AIMIM एकत्र उभे आहेत. हे लोक प्रत्येकाला मदत करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) जेव्हा जेव्हा गरज असते, तेव्हा केसीआर यांचा बीआरएस पक्ष त्यांना पाठिंबा देतो. बीआरएसने जीएसटी आणि शेतकरी विधेयकातही पंतप्रधान मोदींना मदत केली."

राहुल पुढे म्हणतात, "जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत असते, तिथे एआयएमआयएम आपले उमेदवार उभे करतो. आसाम असो, महाराष्ट्र असो वा राजस्थान असो, जिथे भाजपला गरज असते, तिथे हे पक्ष तयार असतात. आता दिल्लीत भाजपचा पराभव करायचा आहे आहे. तेलंगणात बीआरएसला हरवायचे आहे. हे तिन्ही पक्ष एकच आहेत," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

"भाजपचे सर्व नेते माझ्यावर हल्ला करतात. एखाद्या सकाळी भाजप नेत्यांनी माझ्यावर टीका केली नसेल, तर मला बरं वाटत नाही. मी स्वतःलाच सांगतो की, काहीतरी चुकत असेल. पण भाजपचा कोणताही नेता केसीआर आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करत नाही. त्यांच्याविरोधात ईडी आणि आयकरचे कोणतेही प्रकरण नाही, त्यांच्यावर छापे टाकले जात नाहीत," असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: telangana-election-2023-rahul-gandhi-slams-kcr-brs-bjp-pm-modi-asaduddin-owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.