मंदिर वही बनेगा; देवेंद्र फडणवीसांनी आळवला 'राम' राग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:38 AM2018-12-14T05:38:53+5:302018-12-14T06:18:57+5:30
राम मंदिराची लढाई ही सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात ध्रुवीकरण आणि राजकारण कोणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
- विकास झाडे
नवी दिल्ली : राम मंदिराची लढाई ही सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात ध्रुवीकरण आणि राजकारण कोणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
प्रभु श्रीरामाने आम्हाला मर्यादा शिकवली. महात्मा गांधीही रामराज्य यावे, असे सांगत होते. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत. त्यामुळे न्यायपालिकेचा सन्मान करू. राम मंदिर हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेचा प्रश्न आहे. या देशातील मानबिंदू व संस्कृती पुसण्यासाठी राम मंदिर तोडले गेले. आता प्रश्न हा नाही की, मंदिर केव्हा होईल? मंदिर जागेवर आहेच. भव्य मंदिर केव्हा होईल हा मुद्दा उरला आहे. मंदिर उभारले जावे यासाठी आमचे प्रयत्न असतीलच. मात्र कोणी मशीद तोडत असेल तर त्याला माझा विरोध असेल. मशिदीच्या बाजूने मी उभा राहीन. मंदिराबाबत संसदेत कायदा व्हावा असे वाटते का? असा प्रश्न विचारता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ नाही. राहुल गांधी अलिकडे मंदिरात जात असतात. त्यांनी जर राम मंदिरास पाठिंबा दिला तर राज्यसभेत हा कायदा सहज मंजूर होऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले.