Rahul Gandhi : "देशानं माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही, तर जोडेही मारले..."; जाणून घ्या राहुल गांधी नेमकं काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 06:27 PM2022-04-09T18:27:05+5:302022-04-09T18:29:48+5:30
आपल्याला सत्तेचा कसलाही मोह नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे...
नवी दिल्ली - या देशाने मझ्यावर केवळ प्रेमच केले नाही, तर मला जोडेही मारले आहेत. या देशाने मला शिकण्यासाठी मारले आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याचवेळी, भारत आपल्यासाठी एका प्रेमिकेप्रमाणे आहे, जसा आहे, आपण त्यावर एका प्रियकराप्रमाणे प्रेम करतो आणि त्याला समजण्याचा प्रयत्न करतो, असेही राहुल म्हणाले, ते एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी, आपल्याला आजही सत्तेचा मोह नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. तसेच, काही लोक सकाळपासून सायंकाळपर्यंत सत्ता कशी मिळवता येईल, याचाच विचार करतात. मात्र, आपण सत्तेत जन्माला आलो असतानाही आपल्याला त्यात रस नाही, असेही केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी कुणाचेही नाव न घेता म्हणाले.
देशाने केवळ प्रेमच केले नाही, तर जोडेही मारले - राहुल गांधी
'द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलायझिंग आंबेडकर्स व्हिजन' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना राहुल म्हणाले, 'देशाने मझ्यावर केवळ प्रेमच केले नाही, तर मला जोडेही मारले आहेत. नाही, तुम्ही समजू शकत नाही. या देशाने मला किती जोराने आणि किती हिंसेने मारले आहे. मी विचार केला, की हे काय सुरू आहे आणि उत्तर मिळाले, की देश मला शिकवू इच्छित आहे. देश मला सांगतोय की तू शिक, तू समजून घे. त्रस झाला तरी काही नाही, शिक आणि समजून घे.'
#WATCH देश ने मुझे सिर्फ़ प्यार ही नहीं दिया है बल्कि जिस हिंसा के साथ इस देश ने मुझे मारा-पीटा है, मैंने सोचा कि यह क्यों हो रहा है? और जवाब मिला कि देश मुझे सिखाना चाहता है। देश मुझे कह रहा है कि तुम सिखो, समझो: दिल्ली में एक किताब के विमोचन के दौरान कांग्रेस नेता राहुल गांधी pic.twitter.com/oNgJkmLMEM
— ANI_HindiNews (@AHindinews) April 9, 2022
देशला प्रियकरासारखे समजू इच्छितो -
राहुल गांधी म्हणाले, 'मी देशाला अगदी अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करत आहे, जसे एक प्रियकर एखाद्यावर प्रेम करतो आणि तिला समजून घेऊ इच्छितो.' याचवेळी, निवडणुकीतील आपल्या यशापयशावर बोलताना राहुल म्हणाले, "माझ्या देशाने मला दिलेले प्रेम, हे माझ्यावरील ऋण आहे. हे ऋण कसे फेडायचे, याचा विचार मी करत राहतो. देशानेही मला धडा शिकवला आहे... देश मला सांगतो आहे, की तू शिक आणि समजून घे. माझ्या देशाने कुठलेही कारण नसताना माझ्यावर एवढे प्रेम केले आहे. हे माझ्यावर देशाचे ऋण आहे, यामुळेच मी देशाला समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो."