The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:34 PM2022-03-14T15:34:12+5:302022-03-14T15:36:41+5:30

केरळ काँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

The Kashmir Files: Deleting that tweet about Kashmiri Pandits of death, Congress has now given an explanation | The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

The Kashmir Files: काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दलचं ते ट्विट डिलिट केलं, काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिलं

googlenewsNext

नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. त्यातच, केरळकाँग्रेसने काश्मीर पंडितांच्या जम्मू काश्मीरमधील पलायनासदर्भात अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटला अनेकांनी प्रत्युत्तर देत हा मुद्दा खोटा ठरवला आहे. 

केरळकाँग्रेस ट्विट करुन काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या या ट्विटला युजर्संने प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळ काँग्रेसने कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले होते. ''ज्यानी कश्मिरी पंडितांना लक्ष्य केले ते दहशतवादी होते. सन 1990 ते 2007 या कालावधीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली आहे. तर, या 17 वर्षांच्या कालावधीत 15 हजार मुसलमांनाची दहशतवाद्यांनी हत्या केली.'', असे केरळ काँग्रसने म्हटले आहे. तसेच, काश्मिरी पंडिताचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसार झाले होते, जे स्वत: आरएसएसचे होते. 


भाजपने समर्थन केलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारवेळी पंडितांचे पलायन झाले होते. भाजपच्या समर्थनातून व्ही.पी.सिंग यांचे सरकार डिसेंबर 1989 मध्ये सत्तेत आले होते. त्यानंतर, बरोबर 1 महिन्यांनी पंडितांचे पलायन सुरू झाले होते. भाजपने यावर काहीही केले नाही, याउलट नोव्हेबर 1990 पर्यंत व्ही.पी. सिंग सरकारला आपलं सर्मथन दिलं, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, काँग्रेसने काश्मीरमध्ये पंडितांसाठी 5242 घरं बनवली. पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केली. त्यामध्ये, पंडितांच्या मुलांसाठी स्कॉलरशीप आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश होता, असा दावाही काँग्रेसने केला. 

दरम्यान, काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन ते ट्विट डिलिट केलं आहे. या ट्विटचा वेगळाच अर्थ काढण्यात आला. भाजपचे जातीय अपप्रचाराचा मुद्दा बनवल्याने कालच्या ट्विटमधील काही भाग आम्ही काढला असून वस्तूनिष्ठतेवर आजही आम्ही कायम आहोत, असे केरळ काँग्रसेने आज ट्विट करुन म्हटलं आहे.  

 

Web Title: The Kashmir Files: Deleting that tweet about Kashmiri Pandits of death, Congress has now given an explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.