देशाचा मुख्य लढा संविधान संरक्षणासाठी, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:19 AM2024-11-04T06:19:02+5:302024-11-04T06:21:23+5:30
Rahul Gandhi: आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही, तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असे उद्गार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी काढले.
वायनाड (केरळ) : आज देशातील मुख्य लढा संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आहे. देशाची राज्यघटना द्वेषाने नाही, तर विनयशीलता आणि प्रेमाने लिहिली गेली आहे, असे उद्गार काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी काढले. ते प्रियंका गांधी-वढेरा यांच्या प्रचारासाठी येथील मनंथवाडी येथे आयोजित एका सभेत बोलत होते.
वायनाड येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राहुल म्हणाले, ‘आज देशाच मुख्य लढा हा संविधानाच्या संरक्षणाचा आहे. ज्या लोकांनी इंग्रजांशी लढा दिला, ज्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला त्यांनी संविधान लिहिले आहे, असे राहुल म्हणाले. राहुल यांनी यावेळी प्रियंका यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणी तसेच बहिणीचे गुण सांगितले.