जनतेला नकारात्मकता अमान्य, खोट्या आरोपांवर विश्वास नाही; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:41 AM2023-02-09T06:41:38+5:302023-02-09T06:42:28+5:30

आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केले आहे, प्रत्येक क्षण  खर्च केल्यामुळे लोकांची विश्वासार्हता मिळाली. देशातील जनता खोट्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. माझ्यावरील देशवासीयांचा विश्वास त्यांच्या (विरोधकांच्या) आकलनापलीकडचा आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

The public does not believe negativity false accusations; Prime Minister Modi attacks the opposition | जनतेला नकारात्मकता अमान्य, खोट्या आरोपांवर विश्वास नाही; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

जनतेला नकारात्मकता अमान्य, खोट्या आरोपांवर विश्वास नाही; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

Next

नवी दिल्ली : देशातील जनता नकारात्मकता स्वीकारू शकत नाही आणि आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांवर कधीही विश्वास ठेवणार नाही. १४० कोटी देशवासीयांच्या आशीर्वादाचे संरक्षण कवच आपल्याकडे आहे, जे कोणीही भेदू शकत नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधकांवर केला. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर सभागृहाने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर केला. पंतप्रधान उत्तर देण्यापूर्वीच भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे दीड तासाच्या भाषणात मोदी म्हणाले की, २००४ ते २०१४ पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचा काळ हा सर्वाधिक घोटाळ्यांचा होता. या काळात नागरिकांना असुरक्षित वाटत होते. ‘२जी’, सीडब्ल्यूजी व इतर घोटाळ्यांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या दहा वर्षांत जागतिक व्यासपीठांवर भारताची प्रतिष्ठा इतकी कमकुवत झाली होती की, जग त्याचे ऐकायला तयार नव्हते.

आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केले आहे, प्रत्येक क्षण  खर्च केल्यामुळे लोकांची विश्वासार्हता मिळाली. देशातील जनता खोट्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. माझ्यावरील देशवासीयांचा विश्वास त्यांच्या (विरोधकांच्या) आकलनापलीकडचा आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

‘तेथे किती सुंदर प्रवास करता येतो’
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, अहंकारात बुडलेल्यांना वाटते की मोदींना शिव्या देऊनच त्यांना मार्ग सापडेल आणि ते खोटे आरोप करूनच पुढे जाऊ शकतील. पंतप्रधानांच्या उत्तरावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सभागृहात उपस्थित होते.

- त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा एक भाग म्हणून काश्मीर दौऱ्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी अलीकडेच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे तेदेखील पाहू शकतात की, तेथे किती सुंदर प्रवास करता येतो.

तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं...
काँग्रेसचे नाव न घेता, त्यांच्या ढासळत्या जनाधाराची खिल्ली उडवत पंतप्रधानांनी प्रसिद्ध कवी दुष्यंत यांच्या ओळी वाचून दाखवल्या, ‘तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है की फिर भी तुम्हें यकीन नहीं...।’

मोदी म्हणाले...
- २०१४ पूर्वीचे दशक हरवलेले दशक म्हणून ओळखले जाईल आणि २०३० हे दशक संपूर्ण जगासाठी ‘भारताचे दशक’ ठरेल.
- आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या जी-२० गटाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे.
- उज्ज्वला योजना, मोफत अन्नधान्य, घर आदींचा लाभ मिळालेल्या देशातील माता, भगिनी आणि मुली अशा शिव्याशाप आणि खोट्या आरोपांवर कसा विश्वास ठेवतील?
- कोरोनाच्या गंभीर स्थितीत देश ज्या प्रकारे हाताळला गेला, त्यामुळे संपूर्ण देश आत्मविश्वासाने भरला आहे. सकारात्मकता, आशा आणि विश्वास आहे.

‘अदानी’ मुद्दा टाळला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाचा दाखला देत मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते. परंतु पंतप्रधान त्यांच्या उत्तरात अदानी समूहाच्या मुद्द्यावर किंवा जेपीसीच्या मागणीवर काहीही बोलले नाहीत.

अदानींना वाचविण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
- पंतप्रधानांच्या सभागृहातील उत्तरानंतर राहुल गांधी यांनी मोदींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यात तथ्य नसून ते उद्योगपती गौतम अदानी यांचा बचाव करत असल्याचा आरोप केला. 
- ते संसद भवन संकुलात पत्रकारांना म्हणाले, “जर (अदानी) मित्र नसते तर चौकशी होईल असे सांगितले असते.” आम्ही तपास करणार नाही आणि उत्तरही देणार नाही. पंतप्रधान फक्त त्यांच्या मित्राला पाठिंबा देणार, या आशयाचे ट्विटही त्यांनी केले.

माझे भाषण का हटवले? : राहुल गांधी 
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील बडे उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत गंभीर आरोप केले होते. बुधवारी यातील बहुतांश भाग संसदीय कामकाजातून हटविण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला.

Web Title: The public does not believe negativity false accusations; Prime Minister Modi attacks the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.