जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:22 IST2025-02-04T18:18:23+5:302025-02-04T18:22:16+5:30
मोदी पुढे म्हणाले, "समस्या ओळखणे एक गोष्ट आहे. मात्र, जबाबदारी असेल तर, त्या समस्येच्या समाधानासाठी समर्पित भावाने प्रयत्न करावे लागतात. आमचा प्रयत्न समस्येच्या समाधानाचा असतो आणि आम्ही समर्पित भावाने प्रयत्न करतो.

जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशभरात ७०-७५ टक्के, जवळपास १६ कोटींहूनही अधिक घरांजवळ पाण्याचे कनेक्शन नव्हते. आमच्या सरकारने पाच वर्षांत १२ कोटी कुटूंबांच्या घरात नळाने पाणी देण्याचे काम केले आहे आणि हे काम वेगाने पुढे जात आहे. आम्ही गरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. यामुळेच राष्ट्रपतींनीही आपल्या अभीभाषणात याचे सविस्तर वर्णन केले आहे. जे लोक, गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून आपले मनोरंजन करत असतात, त्यांना संसदेत गरीबांसंदर्भात बोलणे बोरिंगच वाटणार. मी त्यांचा राग समजू शकतो." असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले, "समस्या ओळखणे एक गोष्ट आहे. मात्र, जबाबदारी असेल तर, त्या समस्येच्या समाधानासाठी समर्पित भावाने प्रयत्न करावे लागतात. आमचा प्रयत्न समस्येच्या समाधानाचा असतो आणि आम्ही समर्पित भावाने प्रयत्न करतो.
"आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले आहेत, त्यांना 'मिस्टर क्लीन' म्हणण्याची एक फॅशन झाली होती. त्यांनी एक समस्या ओळखली होती आणि ते म्हणाले होते की, दिल्लीतून एक रुपया निघतो, तर गावात १५ पैसेच पोहोचतात. आता त्यावेळी तर पंचायतीपासून ते संसदेपर्यंत एकाच पक्षाचे राज्य होते. ते सार्वजनिकपणे बोलले होते की, एक रुपया निघतो आणि १५ पैसे पोहोचतात. फारच 'आश्चर्यकारक' हातसफाई होती," असेही मोदी यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी आणि सोनिया गांधी? -
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, "त्या (राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू) खूप थकलेल्या दिसत होत्या, शेवटी बोलू शकत नव्हत्या. बिचाऱ्या महिला राष्ट्रपती," असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते. तर राहुल गांधी यांनीही राष्ट्रपतींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रपतींचे भाषण अत्यंत कंटाळवाणे होते आणि त्यात नवीन काहीच नाही," असं राहुल गांधी यांनी म्हटले होते.