राहुल गांधींच्या सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे, ‘रामलीला’वर आज रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 04:40 AM2018-04-29T04:40:26+5:302018-04-29T04:40:26+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची रामलीला मैदानावर उद्या, रविवार, २९ रोजी रॅली होत असून यासाठी दिल्ली काँग्रेसने बार कोड असलेली ४० हजार ओळखपत्रे जारी केली आहेत.

Today's rally for 40 thousand identities, 'Ram Lila' for Rahul Gandhi's meeting | राहुल गांधींच्या सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे, ‘रामलीला’वर आज रॅली

राहुल गांधींच्या सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे, ‘रामलीला’वर आज रॅली

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची रामलीला मैदानावर उद्या, रविवार, २९ रोजी रॅली होत असून यासाठी दिल्ली काँग्रेसने बार कोड असलेली ४० हजार ओळखपत्रे जारी केली आहेत.
या रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांची नेमकी संख्या जाणून घेणे हा यामागील हेतू आहे. काही नेते सभेतील गर्दीचा आकडा अतिरंजित सांगतात. पण या ओळखपत्रांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांची नेमकी संख्या समजणार आहे.
त्यातून मिळणाऱ्या माहितीतून पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वॉर्ड, ब्लॉक आणि विधानसभा मतदारसंघ यांचा डेटाबेस तयार करण्यासही मदत होणार आहे. याचा उपयोग प्रत्येक वेळी रॅलीसाठी होणार आहे. ही तयारी दोन आठवड्यांपूर्वीच सुरू करण्यात आली. दिल्ली काँग्रेसकडूून होणारे हे शक्तिप्रदर्शनच आहे.
जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर नेतृत्व करणाºया प्रत्येक नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्त्यांसाठी ही ओळखपत्रे घ्यायची आहेत. एखाद्या नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्र्त्यांसाठी १००० ओळखपत्रे घेतल्यास तशी नोंद केली जाईल. त्यानंतर त्या नेत्याच्या भागातून प्रत्यक्ष किती कार्यकर्ते आले, याची तपासणी करता येईल.

काँग्रेसच्या आयटी विभागाचे प्रमुख अनिरुद्ध शर्मा यांनी सांगितले की, रामलीला मैदानाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटवर चार जण असतील. त्यांच्याकडे कॉम्युटर, बार कोड स्कॅनर असेल. प्रवेश करणाºया कार्यकर्त्यांना या माध्यमातून ट्रॅक करता येईल. काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी असा दावा केला आहे की, पक्ष प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांसाठी ओळखपत्र देत आहे. कार्यकर्त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.
 

Web Title: Today's rally for 40 thousand identities, 'Ram Lila' for Rahul Gandhi's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.