Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:57 PM2020-07-13T14:57:58+5:302020-07-13T15:11:44+5:30

Rajasthan Political Crisis : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे

uma bharti says rahul gandhi responsible what happening in rajasthan | Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

Next

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार आहेत असा आरोप उमा भारती यांनी केला आहे. तसेच मध्य प्रदेशामधील परिस्थितीलाही तेच जबाबदार होते असं देखील म्हटलं आहे. "काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना राहुल गांधी मोठं होऊ देत नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत होती. आता सचिन पायलट यांची परिस्थितीही काही फारशी वेगळी नाही" असं सोमवारी उमा भारती यांनी म्हटलं आहे.

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. "आम्ही कधी जागे होणार?, बहुतेक आमचे घोडे तबेल्यातून निघून गेल्यानंतरच आम्ही जागे होणार आहोत" असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं आहे. काँग्रेस व गेहलोत यांनीही पायलट यांच्या बंड मोडून काढायचे आणि पायलट यांना एकटे पाडायचे, ठरविले असावे, असे दिसते. त्यामुळेच राजस्थानात गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत असून प्रत्येक आमदाराला 15 कोटी रुपयांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारीच केला होता.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे अजूनही खुले आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सचिन पायलट यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळे सचिन पायलट यांनी फोन करुन ते बैठकीत कधीपर्यत सहभागी होऊ शकतात हे सांगावं, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. तसेच राजस्थान वैयक्तिक स्पर्धेपेक्षा मोठा असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Results 2020 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"

...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत, थरकाप उडवणारा Video 

Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

Web Title: uma bharti says rahul gandhi responsible what happening in rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.