Amit Shah : "काँग्रेस आता देशातून गायब होतेय, भाजपाच तुमचं भविष्य..."; अमित शाह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 10:43 AM2022-09-04T10:43:25+5:302022-09-04T10:45:51+5:30
BJP Amit Shah And Congress : अमित शाह यांनी केरळ दौऱ्यात काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह (BJP Amit Shah) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस आता देशातून गायब होत असल्याचा टोला लगावला आहे. तसेच भाजपाच राज्याचं भविष्य असल्याचं म्हटलं आहे. भाजपा पक्षच दक्षिणेकडील राज्यांचं भविष्य आहे आणि आता जग कम्युनिस्ट पक्षांपासून मुक्त होत आहे असंही सांगितलं.
अमित शाह यांनी केरळ दौऱ्यात काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. अमित शाह यांनी यावेळी केंद्र सरकारने मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं. "काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट यांनी कधीही अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी काम केलं नाही. फक्त व्होट बँक म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात आलं" असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Congress is on extinction from India and the communist party is on the verge of extinction from the world. In Kerala, only BJP party has a future.
— BJP (@BJP4India) September 3, 2022
- Shri @AmitShahpic.twitter.com/PcceQwDdMO
काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाकडेही दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्या राजवटीत त्यांना भारतरत्न देण्यात आला नाही असं अमित शाह यांनी सांगितलं. तसेच "काँग्रेसला बाहेर काढल्यानंतरच त्यांना भारतरत्न देण्यात आला" असं ते म्हणाले.
राज्यात कार्यकर्त्यांकडून केलं जात असल्याच्या कामाचं कौतुक अमित शाह यांनी यावेळी केलं. "केरळमध्ये देशासाठी काम करत असताना राष्ट्रभक्ती, बलिदान आणि शौर्य यांची गरज आहे" असं देखील म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
The Congress party and the Communists never worked for the welfare of the Scheduled Tribes. They treated them as mere vote bank.
- Shri @AmitShahpic.twitter.com/WpdVBSIBmb— BJP (@BJP4India) September 3, 2022