"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 11:06 AM2021-02-04T11:06:35+5:302021-02-04T11:10:25+5:30
Narendra Singh Tomar And Rahul Gandhi : थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्या एका ट्विटमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राहुल यांनी बुधवारी (3 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. जगभरातील काही हुकुमशहांची नावं त्यांनी ट्विटद्वारे जाहीर केली आहेत. तसेच या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ या अद्याक्षरानेच का सुरू होतात असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे होता. मात्र त्यांच्या या ट्विटला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसही राहुल यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेत नाही म्हणत टीका केली आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे "राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर एमपासून सुरू केलं तर मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांनी जरा बघून टिप्पणी करायला हवी" असं म्हणत तोमर यांनी राहुल गांधींना सणसणीत टोला लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "Marcos (मार्कोस), Mussolini (मुसोलिनी), Milošević (मिलोसेविक), Mubarak (मुबारक), Mobutu (मोबुतू), Musharraf (मुशर्रफ), Micombero (मायकोंबेरो) या सर्व हुकुमशहांची नावं ‘M’ नेच का सुरू होतात?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल https://t.co/Q2VURoA0KA#RahulGandhi#Congresspic.twitter.com/IUlLlT7Sp9
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2021
मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. महिलेने विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. तिकीट नसतानाही ही महिला बरंच सामान घेऊन विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे.
"मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे. ते मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जातेय"https://t.co/k6q7XxPMCx#Congress#RahulGandhi
— Lokmat (@MiLOKMAT) January 30, 2021
"मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत", राहुल गांधींचा घणाघात
"पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे. तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
"लोकशाहीचा सन्मान करणे ही सरकारची मर्जी नाही तर ती सरकारची जबाबदारी", प्रियंका गांधींचा घणाघातhttps://t.co/v737dofchF#PriyankaGandhi#ModiGovt#BJP#FarmersProstest#Congresspic.twitter.com/Z9GBVl7DEF
— Lokmat (@MiLOKMAT) January 31, 2021