वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 06:16 PM2024-02-17T18:16:18+5:302024-02-17T18:19:04+5:30

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला.

Varanasi! BJP washed the place where Rahul Gandhi gave his speech with 51 liters of Ganga water, bharat Jodo Nyay Yatra | वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज वारणसीला पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गोदौलिया चौकात उपस्थितांना संबोधित केले. ही जागा भाजप नेत्यांनी गंगाजलाने धुतली आहे. यामुळे वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 

राहुल यांची सभा झाल्यानंतर यात्रा लक्साकडे निघाली. यानंतर भाजपाचे नेता मुन्ना लाल यादव यांनी ५१ लीटर गंगाजलाने चौक धुतला. यावेळी यादव यांनी राहुल गांधी अशुद्ध असल्याचा आरोप केला. तर तेथे उपस्थित लोकांनी राहुल गांधी यापूर्वी कधीही काशी विश्वनाथ मंदिरात आले नव्हते, असा आरोप केला. 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला. सकाळी ही यात्रा निघाल्यानंतर काही वेळातच राम भक्तांनी त्यांना भगवा ध्वज दाखवला. यावर जय श्री राम लिहिलेले होते. गोहत्या करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या राहुल गांधींसारख्या भ्रष्ट व्यक्तीचे काशीत आगमन झाल्यामुळे काशी अपवित्र झाली आहे, असे निषेध करणाऱ्या नेत्यांचे म्हणणे होते. 

भगवे झेंडे दाखविणाऱ्यांना काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. परंतु राहुल गांधींच्या निषेधादरम्यान त्यांच्या एका समर्थकाने रामभक्तांसमोर उभे राहून रामभक्तांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. तणाव वाढण्यापूर्वी हा व्यक्ती यात्रेत पुढे निघून गेला. 

Web Title: Varanasi! BJP washed the place where Rahul Gandhi gave his speech with 51 liters of Ganga water, bharat Jodo Nyay Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.