"वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो!", राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर वार

By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 02:08 PM2020-12-27T14:08:24+5:302020-12-27T14:11:01+5:30

शेतकऱ्यांना वीराची उपमा देत राहुल यांनी "वीर तुम बढे चलो" शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या आहेत.

veer tum badhe chalo anndata tum badhe chalo rahul gandhi poem | "वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो!", राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर वार

"वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो!", राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर वार

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधी यांनी कविता ट्विट करुन दिला शेतकऱ्यांना पाठिंबामोदी सरकारच्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांसोबत असल्याचं राहुल यांनी म्हटलंदिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचे फोटो केले ट्विट

नवी दिल्ली
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक कविता ट्विट केली आहे. 

राहुल यांनी या कवितेतून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना वीराची उपमा देत राहुल यांनी "वीर तुम बढे चलो" शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या आहेत. शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर प्रशासनाकडून होणारी अडवणूक, त्यांच्यावर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा अशा सर्वांचा उल्लेख राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या जाचाला शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, असं म्हणत राहुल यांनी शेतकरी आंदोलकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.  

राहुल यांची कविता...
वीर तुम बढ़े चलो
धीर तुम बढ़े चलो
वॉटर गन की बौछार हो
या गीदड़ भभकी हज़ार हो
तुम निडर डरो नहीं 
तुम निडर डटो वहीं
वीर तुम बढ़े चलो
अन्नदाता तुम बढ़े चलो!

राहुल यांनी या कवितेसोबत शेतकरी आंदोलनाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. या फोटोंमधून शेतकरी आंदोलकांसमोर आव्हानं दाखविण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलकांवर होणारे पाण्याच्या फवाऱ्याचे मारे, शेतकऱ्यांना झालेल्या जखमा, वृद्ध महिला शेतकऱ्यांचा बोचऱ्या थंडीत ठिय्या आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी असे काही फोटो राहुल यांनी कवितेसोबत ट्विट केले आहेत. 
 

Web Title: veer tum badhe chalo anndata tum badhe chalo rahul gandhi poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.