"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 09:49 AM2020-07-08T09:49:24+5:302020-07-08T09:57:43+5:30
कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या मागील पाच दिवसांत लाखभराने वाढल्याने देशाने सात लाख रुग्णांचा टप्पा पार केला. मंगळवारी एका दिवसात 22 हजार 252 नवे रुग्ण आढळले. बाधितांची संख्या एक लाख होण्यासाठी 110 दिवसांचा कालावधी लागला तर त्यानंतर केवळ 49 दिवसांत आणखी सहा लाख रुग्णांची भर पडली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. कोरोना व्हायरसवरून जोरदार टीका करत आहेत.
राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधताना निकृष्ट साहित्य खरेदी केलं जात असल्याचं म्हटलं होतं. तसेच खासगी कंपनीच्या व्हेंटिलेटर गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्याला आता व्हेंटिलेटर तयार करणाऱ्या कंपनीने उत्तर दिलं आहे. "राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहीत नाही" असं म्हटलं आहे. व्हेंटिलेटर बनवणारी कंपनी अॅगवा व्हेंटिलेटरचे सह-संस्थापक प्रोफेसर दिवाकर वैश यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
#WATCH राहुल गांधी के AgVa वेंटिलेटर में तकनीकी खामियां होने का आरोप लगाने वाली मीडिया रिपोर्ट ट्वीट करने पर AgVa हेल्थकेयर वेंटिलेटर के को-फाउंडर प्रो.दिवाकर वैश। pic.twitter.com/g37QpCf8E0
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2020
दिवाकर वैश यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरशी संबंधित बातम्यांची तपासणी न करता राहुल गांधी यांनी रिट्वीट केलं. राहुल गांधी डॉक्टर नाहीत, त्यांना व्हेंटिलेटर कसे तपासायचे हे माहीत नाही. भारतीय व्हेंटिलेटर्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाऊ नये ही आंतरराष्ट्रीय निर्मात्यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच ते स्वदेशी प्रयत्न थांबवू पाहत आहेत. राहुल गांधी यांना हवे असल्यास व्हेंटिलेटर कसे कार्य करते याचा आम्ही डेमो देऊ शकतो.
#WATCH दिल्ली और मुंबई के कुछ अस्पतालों में लगे AgVa हेल्थकेयर के वेंटिलेटर में तकनीकी खामियां होने का आरोप लगाने वाली मीडिया रिपोर्ट पर AgVa हेल्थकेयर वेंटिलेटर के को-फाउंडर प्रो.दिवाकर वैश। pic.twitter.com/34vVvGk6xe
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2020
राहुल यांनी काही दिवसांपूर्वी "पीएम केअर्स फंडाचा वापर करून कोरोना रूग्णांसाठी कमी दर्जाचे व्हेंटिलेटर खरेदी केले जात आहेत. पीएम केअर्समधील अस्पष्टतेमुळे भारतीयांचे जीव धोक्यात येत आहे आणि निकृष्ट साहित्य खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैशांचा उपयोग केला जात आहे" असं म्हटलं होतं. तसेच त्या संदर्भातील एक माहितीही रिट्विट केली होती. यानंतर व्हेंटिलेटर तयार करणाऱ्या कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
व्हायरल मेसेजने खळबळ, आरोग्य मंत्रालयाने दिले चौकशीचे आदेशhttps://t.co/7Z1VsfUL0s#coronavirus#CoronavirusInIndia#TarunSisodia#Suicide
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"
सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...
धक्कादायक! "माझी हत्या होऊ शकते", कोरोनाग्रस्त पत्रकाराच्या आत्महत्येनंतर 'ते' चॅट व्हायरल
राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल
CoronaVirus News : मुंबई, दिल्लीतून आनंदाची बातमी पण देशातील 'या' राज्यांनी वाढवली चिंता
कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग