Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:27 PM2019-04-23T19:27:03+5:302019-04-23T19:27:46+5:30

खूनाचा आरोपी हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, तर जय शहा जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शहा यांनी 50 हजार रुपयांचे 80 कोटी केलेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Video: BJP president accused of murder Says Congress President Rahul Gandhi | Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

Next

जबलपूर - खूनाचा आरोपी हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, तर जय शहा जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शहा यांनी 50 हजार रुपयांचे 80 कोटी केलेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गेल्या 5 वर्षात देशातील जनतेसोबत नरेंद्र मोदी यांनी अन्याय केला. त्यामुळे आत्ता आम्ही बेरोजगार युवकांसोबत आम्ही न्याय करणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर एका वर्षात 22 लाख सरकारी पदं भरली जातील. त्याचबरोबर स्थानिक संस्थांमध्ये 10 लाख युवकांना नोकरी देणार असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी सभेत दिलं. अमित शहा युवकांना सांगतात पकोडे विका, का? देशातील जवानांनी राफेल का बनवू नये? राफेलचं निर्माण देशातील युवकांनी केलं पाहिजे, आपल्याला फ्रान्सकडून राफेल घेण्याची गरज नाही असं राहुल गांधी यांनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है असं म्हटलं होतं त्यानंतर राहुल गांधींच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. मात्र त्यानंतरही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माझ्यासोबत केवळ 15 मिनिटे बोलावे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे आव्हान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिले होते. रायबरेली येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे आव्हान मोदींना दिले होते. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज तिसरा टप्पा पार पडला आहे. अजून मतदानासाठी 4 टप्पे शिल्लक आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि विरोधक काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. मात्र या सगळ्यांचा निकाल 23 मे रोजी देशसमोर स्पष्ट होईलच. 

Web Title: Video: BJP president accused of murder Says Congress President Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.