"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:16 PM2024-08-06T12:16:11+5:302024-08-06T12:17:45+5:30

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या आठवड्यात रामचैत यांच्या दुकानात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी हाताने चप्पल शिवली होती.

Video cobbler return gifts to Congress Rahul Gandhi says dont call me malik | "मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरला पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या आठवड्यात रामचैत यांच्या दुकानात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी स्वत:च्या हाताने चप्पल शिवली होती. त्यानंतर त्यांनी रामचैत यांच्यासाठी एक मशीन पाठवलं. रामचैत यांनी राहुल गांधींसाठी रिटर्न गिफ्ट दिलं आहे, जे त्यांना खूप आवडलं. चामड्याचे काळ्या रंगाचे बूट पाठवले आहेत. यानंतर राहुल यांनी फोन करून रामचैत यांचे आभार मानले. 

राहुल गांधी यांना यावेळी रामचैत यांनी मालक असं म्हटलं. तेव्हा राहुल यांनी त्यांना अडवलं आणि मला भाऊ म्हणा असं सांगितलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हि़डीओ शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारताची सर्वात मोठी संपत्ती कामगार कुटुंबांच्या 'पारंपारिक कौशल्यांमध्ये' आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात विविध स्किल असलेले कोट्यवधी प्रतिभावान लोक आहेत. जर त्यांना आवश्यक पाठबळ मिळालं तर ते केवळ स्वतःचच नाही तर देशाचे नशीबही बदलू शकतात.

जेव्हा रामचैत यांनी जेव्हा राहुल गांधींसाठी बूट पाठवले तेव्हा राहुल यांनी फोन करून त्यांचे आभार मानले. राहुल म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी खूप सुंदर बूट पाठवले आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर रामचैत म्हणाले की, मालक तुमच्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत. यावर राहुल यांनी त्यांना अडवलं आणि मालक म्हणू नका, भाऊ म्हणा, असं सांगितलं. 

राहुल गांधी हे २६ जुलैला सुलतानपूरला गेले होते. यावेळी त्यांनी रामचैत नावाच्या व्यक्तीच्या दुकानात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांचं काम आणि अडचणी जाणून घेतल्या. लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चप्पल देखील शिवली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: Video cobbler return gifts to Congress Rahul Gandhi says dont call me malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.