Rahul Gandhi : Video - राहुल गांधींनी अमेरिकेतील ट्रक ड्रायव्हरला विचारलं, किती कमावतो?; उत्तर ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:12 PM2023-06-13T12:12:31+5:302023-06-13T12:21:03+5:30

Congress Rahul Gandhi : ड्रायव्हर तेजिंदर गिलने महिन्याची कमाई सांगितली तेव्हा राहुल गांधी हैराण झाले.

Video Congress Rahul Gandhi in us truck yatra washington dc to new york | Rahul Gandhi : Video - राहुल गांधींनी अमेरिकेतील ट्रक ड्रायव्हरला विचारलं, किती कमावतो?; उत्तर ऐकून व्हाल हैराण

Rahul Gandhi : Video - राहुल गांधींनी अमेरिकेतील ट्रक ड्रायव्हरला विचारलं, किती कमावतो?; उत्तर ऐकून व्हाल हैराण

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अलीकडेच त्यांनी वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा 190 किमीचा प्रवास ट्रकमधून केला. याच दरम्यान त्यांनी ट्रकचा चालक तेजिंदर गिल याच्याशीही चर्चा केली. राहुल यांनीी या संवादाचा व्हिडिओही शेअर केला आहे. प्रवासादरम्यान ट्रकचालकाच्या महिन्याच्या कमाईबाबतही प्रश्न विचारला. जेव्हा ड्रायव्हर तेजिंदर गिलने महिन्याची कमाई सांगितली तेव्हा राहुल गांधी हैराण झाले.

राहुल गांधी यांनी यापूर्वी पंजाबमध्येही ट्रक ट्रिप केली होती. त्यानंतर त्यांनी अमृतसरमधील ट्रक चालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता राहुल अमेरिकेत ट्रकमधून प्रवास करताना दिसले. ट्रक चालकाच्या शेजारील सीटवर बसून राहुल यांनी हा प्रवास केला. यावेळी राहुल म्हणाले, अमेरिकेचे ट्रक भारतापेक्षा अधिक आरामदायी आहेत. ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन हे बनवले आहेत. तेजिंदर गिलने सांगितले की, "ट्रकची सुरक्षा खूप जास्त आहे. पोलीस त्रास देत नाहीत. चोरीची भीती नाही."

"जर तुम्ही अमेरिकेत गाडी चालवलीत तर एका महिन्यात 4-5 लाख रुपये सहज कमावता येतील. आमचा ट्रक ड्रायव्हर 8-10 हजार डॉलर्स आरामात कमावतो. म्हणजेच भारतानुसार तुम्ही एका महिन्यात 8 लाख रुपये कमवू शकता. हे ऐकून राहुल गांधींना आश्चर्य वाटलं, ते म्हणतात किती... 8 लाख रुपये. यावर ट्रकचालक सांगतो की, या उद्योगात खूप पैसा आहे. ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे."

तेजिंदर म्हणाला, तुम्ही लोक खूप कठीण काम करत आहात. आपणास शुभेच्छा. तुम्ही लोक खूप मेहनत करत आहात. येथे ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येतो. पण भारतात ट्रक चालवल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. राहुल पुढे सांगतात की, भारतात आणखी एक गोष्ट आहे, तिथे ट्रक ड्रायव्हरकडे ट्रक नसतो, तो ट्रक दुसऱ्याचा असतो. भारतात कर्जासाठी मालमत्तेची कागदपत्रे आवश्यक आहेत. गरिबांकडे मालमत्तेची कागदपत्रे नाहीत. म्हणूनच ते दुसऱ्यांचा ट्रक चालवत राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video Congress Rahul Gandhi in us truck yatra washington dc to new york

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.