VIDEO : कार्यकर्ता सेल्फीसाठी आला अन् मंत्र्यांनी लगावली चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:28 PM2018-02-05T13:28:17+5:302018-02-05T16:15:06+5:30
आपल्या नेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला मंत्र्यांनी चपराक लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बंगळुरु - आपल्या नेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला मंत्र्यांनी चपराक लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटकात ही घटना घडली आहे. सध्या कर्नाटकमध्ये निवडणुकीचे वातावरण असून प्रचारासाठी सर्वजण मैदानात उतरले आहेत. कर्नाटकाचे ऊर्जामंत्री डी.के शिवकुमार यांच्यासोबत एक कार्यकर्ता सेल्फीसाठी गेला होता. कार्यकर्त्यांनी सेल्फीकाढण्यासाठी खिशातून फोन काढला तोच शिवकुमार यांनी त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्यामुळं फोन खाली पडला. पण हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या हा व्हिडीओ व्हायरला झाला आहे. एएनआयनं हा व्हिडीओ ट्विट केला आहे. ही घटना काल झाली आहे.
या व्हिडीओमध्ये मंत्री गर्दीमध्ये दिसत आहेत. त्याच वेळी एक कार्यकर्ता खिशातून फोन काढून सेल्फी घेऊ लागला. त्याचवेळी मंत्र्यांनी त्याच्या हातावर चपराक लगावत सेल्फी काढण्यापासून त्याला अडवलं. शिवकुमार बल्लारी येथील विजयनगर कॉलेजच्या मैदानात काढलेल्या निवडणुक रॅलीत काल भाषणासाठी गेले होते. 10 फेब्रुवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची येथे रॅली होणार आहे.
काल शिवकुमार येथे हॅलिकॉप्टरने पोहचले होते. त्यांच आगमन होताच कार्यकर्त्यांनी सेल्फीसाठी मोबाईल काढलं. शिवकुमार यांचा स्वगत समारंभ सुरु होता त्यावेळी एक कार्यकर्ता हातात मोबइल घेऊन सेल्फी घेऊ लागला. त्यावेळी शिवकुमार यांना राग आला. त्यांनी त्याचवेळी त्याच्या हातावर चपराक लगावली.
पाहा व्हिडीओ -
#WATCH Karnataka Minister DK Shivkumar slaps away phone of a man who was trying taking a selfie with him in Bellary (4.2.18) pic.twitter.com/iLo6OSyT2Z
— ANI (@ANI) February 5, 2018
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशिल आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत कर्नाटकमध्ये सभा घेतली होती.