Video: काँग्रेसच्या महिला मंत्र्यांची भाषणावेळी गोची; म्हणाल्या, 'आगे कलेक्टर साहब पढेंगे'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 03:54 PM2019-01-26T15:54:39+5:302019-01-26T15:55:37+5:30
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी सध्या सोशल मीडियात जास्त चर्चा सुरु आहे. इमरती देव यांना प्रजासत्ताक दिनी लिहून देण्यात आलेले भाषण वाचता आले नाही.
भोपाळ : मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री इमरती देवी यांची सध्या सोशल मीडियात जास्त चर्चा सुरु आहे. इमरती देवी यांना प्रजासत्ताक दिनी लिहून देण्यात आलेले भाषण वाचता आले नाही. त्यांनी आपले काम जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास भाग पाडले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ग्वालियर येथील एसएएफ ग्राऊंडमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इमरती देवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात भाषणादरम्यान इमरती देवी यांची चांगलीच दमछाक झाली. लिहून दिलेले भाषण त्यांना पूर्ण वाचता आले नाही. जवळास भाषणातील 50 शब्द त्यांनी अडखळत वाचले. त्यामधीलही काही शब्द चुकीचे उच्चारले. त्यांनतर त्यांनी भाषण अर्धवट सोडले आणि भाषण वाचण्याची धूरा चक्क जिल्हाधिकाऱ्यांवरच टाकली. त्यानंतर जिल्हाधिकारी भरत यादव यांनी त्यांचे भाषण पूर्ण वाचून दाखविले.
#WATCH Madhya Pradesh Minister Imarti Devi in Gwalior asks the Collector to read out her #RepublicDay speech pic.twitter.com/vEvy1YVjRM
— ANI (@ANI) January 26, 2019
दरम्यान, इमरती देवी यांच्या भाषणाची चर्चा सर्वत्र पसरली. याविषयी बोलताना इमरती देवी यांनी सांगितले की, 'गेल्या दोन दिवसांपासून मी आजारी होते. त्यामुळे भाषण करताना मला अस्वस्थ वाटत होते'.