Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:26 PM2023-12-20T12:26:56+5:302023-12-20T12:33:52+5:30

संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Video: 'Remember who mimicked whom in the Lok Sabha'; Congress Jairam Ramesh counter attack on PM Narendra Modi BJP after MP's Suspension | Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

Video: 'तेव्हा कोणी कोणाची मिमिक्री केलेली, ते ही लोकसभेत'; काँग्रेसचा भाजपवर पलटवार

Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ) : संसदेत सध्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळावरून त्यांच्यावर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज भाजपाने पुन्हा एकदा विरोधकांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी धनखड यांना फोन केला आहे, तसेच राष्ट्रपदी मुर्मू यांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना काँग्रेसने मोदींचा लोकसभेतील मिमिक्री करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत भाजपला प्रत्यूत्तर दिले आहे. 

खासदारांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील निलंबनाच्या मुद्द्यावरून लक्ष हटविण्यासाठी सत्ताधारी मिमिक्रीचा मुद्दा बनवत आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राहुल गांधी यांची मिमिक्री केली होती, अशी आठवण काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करून दिली आहे. तसेच रमेश यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर मोदींचा मिमिक्री करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत ''तेव्हा लोकसभेत कोणी कोणाची नक्कल केलेली, आठवतेय का'', असे कॅप्शन दिले आहे. 

संपूर्ण मोदी इकोसिस्टम आता तथाकथित मिमिक्रीच्या नॉन इश्यूवर सक्रिय होत आहे. म्हैसूरच्या एका भाजप खासदाराने १३ डिसेंबर रोजी लोकसभेत दोन आरोपींना प्रवेश का आणि कसा मिळवून दिला, या खर्‍या मुद्द्यावर ते मौन बाळगून आहेत. या आरोपींवर दहशतवादविरोधी कायदा UAPA अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. पूर्णपणे न्याय्य मागण्या केल्याबद्दल 142 खासदारांच्या निलंबनावरही ही इकोसिस्टिम गप्प आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. 

लोकसभेत आणि राज्यसभेत मागील काही दिवसांत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर संसद परिसरात काल विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फोनवरून संवाद झाला. संसद परिसरात खासदारांनी केलेली घृणास्पद कृती वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मागील २० वर्षांपासून सातत्याने असा अपमान सहन करत आहे. मात्र भारताच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत संसद परिसरात अशी कृती होणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले," अशी माहिती उपराष्ट्रपतींनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरून दिली आहे.

तर त्यानंतर थोड्याच वेळात मुर्मू यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. संसदेच्या परिसरात  उपराष्ट्रपतींचा ज्याप्रकारे अपमान झाला ते पाहून मला खूप वाईट वाटले. निवडून आलेले प्रतिनिधींना स्वत:ला अभिव्यक्त करण्यास स्वतंत्र असले पाहिजेत, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असावी. हीच संसदीय परंपरा आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतातील लोक ते कायम राखतील अशी अपेक्षा आहे असे, मुर्मू यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

Web Title: Video: 'Remember who mimicked whom in the Lok Sabha'; Congress Jairam Ramesh counter attack on PM Narendra Modi BJP after MP's Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.