Video: राहुल गांधींचा 'यात्रा लूक' कायम; संसदेत येताच काँग्रेस नेत्यांनी दिल्या 'भारत जोडो'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:14 PM2023-02-01T17:14:24+5:302023-02-01T17:17:01+5:30
'भारत जोडो यात्रा' संपवून काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले.
Union Budget : 'भारत जोडो यात्रा' संपवून काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भारत जोडोच्या घोषणा देण्यात आल्या. संसदेतील त्यांच्या स्वागताचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल भारत जोडो यात्रेतील लूकमध्येच दिसून आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा त्यांची दाढी लहान होती आणि केस जास्त लांब नव्हते, परंतु यात्रा संपल्यानंतर त्यांच्या दिसण्यात मोठा बदल झाला आहे. त्यांची दाढी वाढली आहे आणि केसही कुरळे झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्याच वाढलेली पांढरी दाढी-केस आणि पांढरा टी-शर्ट लूकमध्ये दिसत आहेत. कारमधून उतरताच काँग्रेस नेत्यांनी संसद भवनाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केली.
"जोड़ो-जोड़ो, भारत जोड़ो" ✊️
— Congress (@INCIndia) February 1, 2023
आज इन नारों के साथ संसद में राहुल गांधी जी का स्वागत हुआ। pic.twitter.com/XYmoFfMC04
30 जानेवारीला यात्रा संपली
7 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतून जाऊन जम्मू-काश्मीरमध्ये संपली. हा प्रवास 150 दिवस चालला आणि 3570 किलोमीटर अंतर कापले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी 12 जाहीर सभा, 100 हून अधिक सभा, 13 पत्रकार परिषदा संबोधित केल्या. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधून पार पडली.
राहुल यात्रेचा दुसरा टप्पा काढणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचा दुसरा टप्पा नक्कीच असेल. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, यात्रेचा अंतिम रोडमॅप अद्याप बनलेला नाही, मात्र दुसरा टप्पा नक्कीच असेल, ज्यामध्ये राहुल गांधी सहभागी होतील. मात्र, दोन-तीन महिन्यांनी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा नक्की होईल, असे वेणुगोपाल म्हणाले. या वेळी प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ शकतो.