VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:46 IST2019-02-14T15:45:06+5:302019-02-14T15:46:10+5:30
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला.

VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!
वलसाड (गुजरात) - सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यावेळी दोन्ही राज्यांत त्यांचे जोरदार स्वागत झाले. मात्र या स्वागतादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले.
त्याचे झाले असे की, राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना काही महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर येत त्यांचे स्वागत केले. यादरम्यान एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांचाही क्षणभर गोंधळ उडाला. तसेच भर स्टेजवर घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चर्चाही झाली.
#WATCH A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad, #Gujaratpic.twitter.com/RqIviTAvZ9
— ANI (@ANI) February 14, 2019
. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. प्रसारमाध्यमांपासून जनसभांपर्यंत सगळीकडे त्यांनी मोदी आणि भाजपाविरोधात रान उठवत आहेत. भाजपा आणि संघ द्वेष पसरवतो. आम्ही मात्र प्रेमच पसरवतो. मोदी शिव्या देतात. काँग्रेस संपवायची भाषा करतात. मात्र मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडत आहे, असे राहुल गांधी अजमेर येथे सेवादलला संबोधिक करताना म्हणाले.