भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:00 AM2024-04-24T11:00:38+5:302024-04-24T11:01:50+5:30

सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Wayanad Lok Sabha Constituency - Strong candidate of CPI, All India Alliance against Rahul Gandhi | भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

मयुरेश वाटवे

वायनाड : केरळमधील सर्व २० लोकसभा जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रतिष्ठेच्या वायनाड मतदारसंघामधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा या निवडणूक लढवत आहेत. तिथे काँग्रेस किंवा सीपीआय भाजपविरोधात नव्हे तर इंडिया ब्लॉकमधील मित्र पक्ष एकमेकांवरच गरळ ओकत आहेत.

सीपीआयने ॲनी राजा यांच्या रूपाने तुल्यबळ चेहरा दिला आहे तर भाजपने प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. सीपीआय म्हणते मतदारसंघाला गरज असते तेव्हा राहुल गांधी गायब असतात. सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

राहुल गांधी यांची आश्वासने
शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किमतीचे कायदेशीर वचन
स्टार्टअपसाठी ५,००० कोटींचा फंड
३० लाख सरकारी नोकरभरती
गरीब महिलांच्या खात्यात दरवर्षी थेट 
१ लाख जमा करणारी महालक्ष्मी गॅरंटी योजना
केंद्रीय नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण

 २०१९ मध्ये काय घडले?

राहुल गांधी
काॅंग्रेस (विजयी)
७,०६,३६७

पी. पी. सुनील
सीपीआय
२,७४,५९७

Web Title: Wayanad Lok Sabha Constituency - Strong candidate of CPI, All India Alliance against Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.