Parliament No-confidence Motion: 'आम्हाला नरेंद्र मोदींचं मौन व्रत तोडायचंय'; अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत गौरव गोगोईंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:54 PM2023-08-08T12:54:45+5:302023-08-08T13:24:34+5:30
Parliament No-confidence Motion: संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. या चर्चेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.
राहुल गांधींच्या जागी गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राहुल गांधी यावर चर्चा करण्यासाठी येणार होते, तेव्हा अचानक बदल करून गौरव गोगोई यांना का पुढे केले जात आहे, असा सवाल भाजप खासदारांनी विचारण्यास सुरुवात केली. चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, 'आम्ही हा अविश्वास प्रस्ताव मणिपूरसाठी आणला आहे. मणिपूरचे तरुण न्याय मागतात. मणिपूरच्या मुली न्याय मागत आहे. मणिपूरचा शेतकरी न्याय मागतोय, असं गौरव गोगाई यांनी सांगितले.
Congress MP Rahul Gandhi is likely to open the discussion on the No Confidence Motion in Lok Sabha today. Party MPs Gaurav Gogoi, Manish Tewari and Deepak Baij to follow: Sources
— ANI (@ANI) August 8, 2023
(File photo) pic.twitter.com/UqYtgTUrDm
मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.
Congress MP Gaurav Gogoi says, "PM took a 'maun vrat' to not speak in the Parliament. So, we had to bring the No Confidence Motion to break his silence. We have three questions for him - 1) Why did he not visit Manipur to date? 2) Why did it take almost 80 days to finally speak… pic.twitter.com/lhFomV5XUQ
— ANI (@ANI) August 8, 2023
गौरव गोगोई पुढे म्हणाले, 'मणिपूरमध्ये भाजपाचे डबल इंजिन निकामी झाले आहे. समाजातील दोन घटकांमध्ये एवढी चिड, एवढा राग आपण कधीच पाहिला नाही. एक वर्ग टेकड्यांवर तर एक वर्ग दरीत राहतो, अशी रेषा राज्यात ओढली गेली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा हवाला देत गौरव गोगोई यांनी सरकारला राजधर्माची आठवण करून दिली आणि मणिपूरमधील दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओचाही उल्लेखही गौरव केला.