इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:21 AM2021-07-13T06:21:26+5:302021-07-13T06:24:07+5:30

संसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य. मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा.

What happened about fuel tax of Rs 25 lakh crore Question by congress leader Mallikarjun Kharge | इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

Next
ठळक मुद्देसंसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य.मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा.

दोन महिन्यांत ३८ वेळा दरवाढ केली. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचे काय केले, असा सवाल काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला.

इंधनाच्या करातून गोळा केलेला हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारांसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारू, असे खर्गे म्हणाले. गांधी भवन येथे पत्रकारपरिषदेत खर्गे यांनी इंधन दरवाढ, महागाई, अर्थव्यवस्था, कृषी कायदे या मुद्द्यांवर मोदी सरकारची पोलखोल केली. ते म्हणाले, संपुआचे सरकार असताना इंधनावर ९.४८ टक्के केंद्रीय कर होता तो वाढवून ३२.९० रुपये केला आहे. संपुआ सरकार असताना क्रूड ऑईलची किंमत १११ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ७१ रुपये लिटर होते आणि आता मोदी सरकारच्या काळात क्रूड ऑईलचे दर ४४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरले असतानाही पेट्रोल १०७ रुपये प्रति लिटर एवढ्या चढ्या भावाने विकले जात आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता ८३४ रुपये झाली आहे, सामान्य माणसांना दिले जाणारे गॅसवरील अनुदानही अनेक महिन्यांपासून शून्य केले आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली तर या माध्यमातून दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे मोदींनी म्हटले होते. याचा अर्थ या योजनेतून आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांची  बचत झाली. डाळीच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत १२.७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सूर्यफुल तेल ५६.३१ टक्क्यांनी तर सोयातेल ५२.६६ टक्क्यांनी महाग झाले आहे. या भाववाढीचा फटका लोकांना बसत आहे, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्यावर आणले होते, मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. संपुआ सरकारने १० वर्षांत कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालवले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे.

कोरोनामुळे वर्षभरात १.३३ लाख नोकऱ्या गेल्या
कोरोनामुळे एका वर्षात १.३३ लाख नोकऱ्या गेल्या. दरडोई उत्पन्न १० हजार रुपयांनी घटले, जीडीपी ९-१० टक्क्यांनी घसरला. देश रसातळाला गेला पण त्याची जबाबदारी मोदी सरकार घेत नसून इंधन दरवाढीला संपुआ सरकारच जबाबदार असल्याचा उलटा आरोप करत आहे. परंतु कररूपाने लाखो कोटी रुपये कमावूनही राज्याच्या हक्कांचा जीएसटी परतावाही मोदी सरकार देत नाही. महाराष्ट्राचा ३२ हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा अजून दिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वगुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, असेही खर्गे म्हणाले.

Web Title: What happened about fuel tax of Rs 25 lakh crore Question by congress leader Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.