काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:03 IST2025-01-05T11:02:42+5:302025-01-05T11:03:35+5:30
Rahul Gandhi News: काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि भाजपामध्ये फरक काय? IIT मद्रासच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं असं उत्तर
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच आयआयटी मद्रासला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना काँग्रेस आणि भाजपा कसे वेगळे आहेत? असा प्रश्न विचालला त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी सांगितले की, काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपा आर्थिक दृष्टीने ट्रिकल डाऊनवर विश्वास ठेवतो. भाजपाच्या मते साधन संपत्तीवर लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. ते आर्थिक दृष्टीने याला ट्रिकल डाऊन म्हणतात. तर सामाजिक मोर्चावर आमच्या मते समाज जेवढा सामंजस्यपूर्ण आणि सौहार्दाने भरलेलाअसेलल, लोक जेवढे कमी वाद घालतील, तेवढंच ते देशासाठी चांगलं ठरेल.
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मोर्चावर इतर देशांसह आमच्या संबंधांच्या पद्धतीबाबत संभवत: काही मतभेद असू शकतील, मात्र हे धोरण जवळपास समान असेल. तसेच सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च केला पाहिजे. ही बाब खासगीकरण किंवा आर्थिक मदतीद्वारे साध्य करता येणारी नाही.