गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 10:01 AM2017-12-18T10:01:51+5:302017-12-18T11:49:20+5:30

गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले होते.

What was the exit poll results? | गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

गुजरात विधानसभा निवडणूक - काय सांगत होते एक्झिट पोलचे निकाल ?

googlenewsNext

नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे निकाल काही वेळानंतर स्पष्ट होतील. गुजरातमध्ये अपेक्षेविरोधात जात काँग्रेस भाजपाला कडवी झुंड देताना दिसत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून गुजरातमधील मतदानाचा कल भाजपाच्या दिशेने असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असून भाजपाला किमान 100 हून अधिक जागा मिळतील, असे सर्वच एक्झिच पोलनी म्हटले होते.
 
नेहमीच धक्कादायक आणि अचूक अंदाज वर्तवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूज 24 टुडेज चाणक्यने भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवली होती.
 
इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये 99-113 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर काँग्रेसला 68-82 जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलं होतं.  2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 116 आणि काँग्रेसला 60 जागा जिंकण्यात यश आले होते. 

टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 109 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच सत्तेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुजरातमध्ये भाजपाला 49 टक्के मतांसह 117 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काँग्रेसला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले होते. तर इतरांच्या खात्यामध्ये केवळ एक जागा जाण्याची शक्यता आहे.    

इतर एक्झिट पोलमध्ये सुद्धा असाच कयास वर्तवण्यात आला होता. या सर्व पोलचा आढावा घेतल्यास भाजपाला साधारणत: 49 टक्के मते आणि 123 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.  

Web Title: What was the exit poll results?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.