नावात काय आहे? 'राहुल गांधी' नावाने वाढवली तरुणाची अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:45 PM2019-07-31T13:45:29+5:302019-07-31T14:08:45+5:30

 नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने त्याच्या प्रसिद्ध नाट्यात विचारला  होता. नावावरून प्रत्येक माणसाची ओळख ठरते. पण...

What's in the name? youth suffers due to name of 'Rahul Gandhi' | नावात काय आहे? 'राहुल गांधी' नावाने वाढवली तरुणाची अडचण

नावात काय आहे? 'राहुल गांधी' नावाने वाढवली तरुणाची अडचण

Next

भोपाळ -  नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने त्याच्या प्रसिद्ध नाट्यात विचारला  होता. नावावरून प्रत्येक माणसाची ओळख ठरते. त्यातही कुठल्यातरी प्रसिद्ध व्यक्तीशी नामसाधर्म्य असणे हे लोक कौतुकाचा विषय समजतात. पण इंदूर येथे राहणाऱ्या एका तरुणासाठी त्याचे नावच अनंत अडचणींचे कारण ठरले आहे. त्याचे झाले असे की, इंदूरमधील अखंडनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे नाव राहुल गांधी असे असून, या नावामुळे त्याला साधे मोबाइलचे सीमकार्ड खरेदी करण्यापासून ते इतर छोट्यामोठी कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तरुणाने आपले आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत राहुल गांधी असे नाव असलेला हा तरुण सांगतो की,  ''माझ्याकडे माझे ओखळपत्र म्हणून केवळ आधार कार्ड आहे. जेव्हा मी मोबाइलचे सीमकार्ड खरेदी करण्यासाठी  किंवा अन्य काही कामासाठी ओळख म्हणून आधारकार्ड दाखवतो, तेव्हा लोक माझ्याकडे संशयाने पाहतात. माझे ओळखपत्र खोटे आहे असा त्यांचा समज होतो.'' 



 ''कुठल्याही कामासाठी जेव्हा मी अनोळखी व्यक्तीला फोन करून माझी ओळख करून देतो. तेव्हा अनेकजण राहुल गांधी कधीपासून इंदूरमध्ये राहायला आलेत, असा टोमणा मारून फोन कट करतात, मला खोटा कॉलर समजतात.'' अशी व्यथा या तरुणाने मांडली. 

 दरम्यान,''पक्षीय राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र सध्याच्या आडनावामुळे  मला माझी ओळख पटवून देताना त्रास होत आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेद्वारे मी माझे गांधी हे आडनाव बदलून मालवीय असे करण्याबाबत विचार करत आहे,'' असे या तरुणाने सांगितले. 

Web Title: What's in the name? youth suffers due to name of 'Rahul Gandhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.