Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:08 AM2023-02-22T10:08:57+5:302023-02-22T10:09:34+5:30

राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या लग्नाशिवाय, आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली...

When will Rahul Gandhi cut his beard Why not married yet A big revelation made by himself | Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा

Rahul Gandhi केव्हा कापणार दाढी? आतापर्यंत का नाही केलं लग्न? स्वतःच केला खुलासा

googlenewsNext

भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या टी-शर्टची आणि दाढीची सर्वाधिक चर्चा झाली. या यात्रेच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी टी-शर्टवर होते. यात्रेदरम्यान त्यांची दाढीही वाढत गेली. ही दाढी त्यानी अजूनही कापलेली नाही. मात्र, आता दाढी केव्हा कापणार यासंदर्भात त्यांनी स्वतःच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केले आहे. याच बरोबर, त्यांनी त्यांच्या लग्नाशिवाय आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली.

राहुल गांधी केव्हा कापणार दाढी? -
इटलीतील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांना त्यांच्या दाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, 'मी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी न कापण्याचा निर्णय घेतला होता. यात्रा संपल्यानंतर आता दाढी ठेवायची की कापायची यासंदर्भात निर्णय घेईन.

राहुल गांधींनी आतापर्यंत का केलं नाही लग्न? - 
या मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. आपण आतापर्यंत लग्न का केले नाही? असा प्रश्न केला असता, राहुल म्हणाले, 'हा एक विचित्र प्रश्न आहे. आतापर्यंत लग्न का केले नाही? मला याचे योग्य उत्तर तर माहीत नाही, पण आयुष्यात करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत.' मात्र, याच वेळी मुलांचे संगोपन करण्याची आपली इच्छा असल्याचेही राहुल म्हणाले.
 

Web Title: When will Rahul Gandhi cut his beard Why not married yet A big revelation made by himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.