राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 10:13 AM2023-07-30T10:13:19+5:302023-07-30T10:13:55+5:30

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

When will Rahul get married On the question of farmer women, Sonia Gandhi said, you see the girl | राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

googlenewsNext

बलवंत तक्षक -

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवर नेहमी फ्रंटफूटवर असतात. मात्र, एक मुद्दा असा आहे, जाे राहुल गांधी नेहमी टाळतात. ताे म्हणजे त्यांच्या लग्नाचा. हरियाणातील शेतकरी महिलांना नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले हाेते. या महिलांनी थेट राहुल यांची आई साेनिया गांधी यांना त्यांचे लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारला. त्यावेळी साेनिया यांनी दिलेले उत्तर ऐकून राहुल काहीसे लाजले. हा व्हीडिओ युट्युबर शेअर करण्यात आला आहे.

साेनिया गांधींनी काय उत्तर दिले? -
राहुल यांच्या लग्नाबाबत विचारताच साेनिया म्हणाल्या, तुम्हीच मुलगी शाेधून द्या ना. हे उत्तर ऐकून बाजूला बसलेले राहुल गांधी काहीसे लाजले आणि स्मितहास्य करीत म्हणाले, हाे, हाेईल. 

२०० रुपये किलाे टाेमॅटाे कसे घेणार -
महिलांनी महागाईचा प्रश्न मांडला. २०० रुपये किलाेच्या दराने टाेमॅटाे काेणाला घेता येईल? गॅस, पेट्राेल, डिझेल सर्व काही महाग झाले आहे. शेतकऱ्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांनी केला.

एका प्रश्नाने साेनिया झाल्या भावुक
साेनिया गांधींना एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्या काही क्षण भावुक झाल्या. राजीव गांधी यांच्या निधनानंतर तुम्ही सर्वकाही कसे सांभाळले, लहान मुले हाेती. त्यावर साेनिया म्हणाल्या, दु:ख खूप माेठे हाेते. जखम खाेलवर झाली हाेती. प्रियांका यांनी पुढे उत्तर दिले की, आई बराच काळ उदास हाेती. अनेक दिवस अन्नपाणी घेतले नाही. कठीण काळ हाेता.

Web Title: When will Rahul get married On the question of farmer women, Sonia Gandhi said, you see the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.