काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:42 AM2024-11-30T02:42:29+5:302024-11-30T02:43:04+5:30
...दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षासाठी एक लक्ष्मणरेषाच आखून टाकली. काँग्रेसने कोणत्या मार्गावर चालायला हवे, हे त्यांनी सांगितले. जात निहाय जनगणना असो अथवा आरक्षण, कशा प्रकारे पुढे जायला हवे? यावर त्यांनी भाष्य केले.
हरियाणानंतर महाराष्ट्रात झालेल्या दारून पराभवाने काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. जेथे विजयाची अपेक्षा होती, तेथे एवढा दारुण पराभव कसा झाला? हे त्यांना अजूनही समजेनासे झाले आहे. शुक्रवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हाच मुद्दा गाजला. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षासाठी एक लक्ष्मणरेषाच आखून टाकली. काँग्रेसने कोणत्या मार्गावर चालायला हवे, हे त्यांनी सांगितले. जात निहाय जनगणना असो अथवा आरक्षण, कशा प्रकारे पुढे जायला हवे? यावर त्यांनी भाष्य केले. एवढेच नाही, तर संभल आणि अजमेरच्या मुद्द्यांवरही पक्षाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.
सूत्रांच्या हवाल्याने न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करावे लागतील, कारण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही. आपण जात निहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली. तर भाजप अस्वस्थ झाला. त्याच्याकडे काहीही उत्तर नाही. याच पद्दतीने संभलसह सर्वच मुद्द्यांवर आपण स्पष्ट भूमिका घ्यायला हवी." यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सीडब्ल्यूसी बैठकीत मंजूर झालेल्या प्रस्तावांची माहिती दिली.
"प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्टचा सन्मान व्हयला हवा" -
वेणुगोपाल म्हणाले, काँग्रेस कार्यकारिणीने एक ठराव मंजूर केला आहे. यात, भाजप यूपीसह संपूर्ण देशात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचे काम करत असल्याचे म्हणण्यात आले आहे. 1991 च्या प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्टचा सन्मान व्हयला हवा. याशिवाय, या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे. या गोष्टीत इतर कुठलाही मध्यम मार्ग असू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.