राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 02:32 PM2019-12-25T14:32:39+5:302019-12-25T14:43:34+5:30

Jharkhand Assembly Election 2019 : माता-पित्याच्या सुटकेसाठी आपण राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांची भेट घालून दिली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून आपल्याला समर्थन मिळाले.

who is amba prasad win jharkhand assembly election 2019 after meet congress rahul gandhi and left upsc exam | राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

googlenewsNext

नवी दिल्ली - हजारीबागच्या बडकागाव विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या 28 वर्षीय अंबा प्रसाद या युवतीने विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. झारखंड विधानसभेत अंबा प्रसाद एकमेव अविवाहित आमदार असून 2019 विधानसभा निवडणुकीतील ती सर्वात कमी वयाची आमदार ठरली आहे. अंबा प्रसादने आजसूच्या रोशनलाल चौधरीचा 30 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

बडकागाव विधानसभा मतदार संघातून याआधी अंबा प्रसादचे वडील योगेंद्र साहू यांनी 2009 मध्ये तर आई निर्मला देवी यांनी 2014 मध्ये प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र कफन सत्याग्रहाच्या वेळी अंबा प्रसादच्या माता-पित्याला कारागृहात टाकण्यात आले. त्यावेळी अंबा दिल्लीत युपीएससीची तयारी करत होती. त्यानंतर घरी परतलेल्या अंबा हिने हजारीबाग न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. तसेच माता-पिता आणि भावाविरुद्ध सुरू असलेल्या केस लढविण्यास सुरू केले.

अंबा प्रसाद हिचे वडील कारागृहात असून आई राज्याच्या बाहेर आहे. तर भावाला सोडविण्यात अंबा हिला यश आले आहे. आपण या मतदार संघातून आमदार होऊ असा कधी विचारही केला नव्हता. मात्र संपूर्ण कुटुंबच कारागृहात गेल्यानंतर आपण बडकागाव विधानसभा मतदार संघातून विजय मिळवून माता-पित्याचे स्वप्न पूर्ण करू अशी शपथ घेतली होती, असंही अंबा प्रसाद हिने सांगितले.

दरम्यान माझ्या संपूर्ण कुटुंबीयांना फसविण्यात आलं आहे. कुटुंब अडचणीत असताना दिल्लीत बसून युपीएससीची तयारी करणे शक्य नव्हतं. त्यामुळे मी परत येऊन वकिली सुरू केल्याचे तिने सांगितले. माता-पित्याच्या सुटकेसाठी आपण राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांची भेट घालून दिली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून आपल्याला समर्थन मिळाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याला पक्षाचं काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. लोकसभेच्या वेळी देखील आपल्या उमेदवारीची चर्चा झाली होती, असंही अंबा प्रसादने नमूद केले.

मंत्रीपदाची मिळणार संधी

झारखंडमध्ये काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारमध्ये अंबा प्रसाद हिच्याकडे शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते. मागील चार वर्षांपासून आपण सक्रिय असून मंत्री होण्याची संधी मिळाल्यास आपण आणखी चांगल काम करू, असंही अंबा प्रसाद हिने सांगितले. 
 

Web Title: who is amba prasad win jharkhand assembly election 2019 after meet congress rahul gandhi and left upsc exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.