PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 09:13 AM2024-03-14T09:13:27+5:302024-03-14T09:13:38+5:30

खरे तर, भाजपने यापूर्वीच्या दोन निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्यात आलेला नाही.

Who is the most popular person for the post of Prime Minister after PM Narendra Modi The name came up in the survey, you will be surprised to know | PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठीचा सर्वात लोकप्रिय चेहरा असल्याचे दिसत आहे. मात्र, नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक पसंती कुणाला? असा प्रश्न निर्माण होतो. खरे तर, भाजपने यापूर्वीच्या दोन निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात आहे. मात्र विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठी चेहरा देण्यात आलेला नाही.

नेटवर्क18 ने केलेल्या एका ओपिनियन पोलनुसार, सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 59 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी सर्वात सक्षम चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत. या सर्व्हेनुसार, 21 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या बाबतीत राहुल गांधी यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत 38 टक्के कमी आहे. 

या शिवाय या सर्व्हेमध्ये सहभागी 9 टक्के लोकांनी तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या मेगा ओपिनियन पोलमध्ये 21 प्रमुख राज्यांच्या 518 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. 12 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. अर्थात एकूण 95 टक्के लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

ओपिनियन पोलनुसार, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांपैकी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 77 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधी I.N.D.I.A. ला केवळ 2 जागा मिळू शकतात. तसेच, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा मिळू शकते.

भाजपची दुसरी यादी जाहीर - 
यातच, भाजपने बुधवारी सायंकाळी 10 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची घोषणा केली असून यातील 12 खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे, तर सात नव्या चेहऱ्यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात आले आहे. भाजपने 2 मार्च रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आजच्या 72 उमेदवारांसह भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे. 
 

Web Title: Who is the most popular person for the post of Prime Minister after PM Narendra Modi The name came up in the survey, you will be surprised to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.