मध्य प्रदेशात कुणाचं सरकार, भाजप की काँग्रेस? सर्व्हे पाहून व्हाल अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:37 PM2023-06-27T20:37:09+5:302023-06-27T20:39:47+5:30
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कंबर कसून कामाला लागले असून विजयाचा दावा करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, हे दोघेही मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करत आहेत. मात्र, हा निर्णय पूर्णपणे जनतेच्या हाती आहे आणि तो निवडणुकीनंतर समोर येईलच.
मात्र, सध्या लोकांच्या मनात नेमके काय सुरू आहे? यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शतील? कोणत्या पक्षाला किती मते मिळतील? हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने सर्व्हे केला आहे.
सी-व्होटरने केलेल्या या सर्व्हेदरम्यान, यावेळी राज्यात भाजप आणि काँग्रेस पैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. यावर जनतेने दिलेले उत्तर चकित करणारे आहे. राज्यात कुणाचे सरकार येणार, हे जनतेने सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यातील 17 हजारहून अधिक लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जाणून घेऊयात काय आहे मध्यप्रदेशातील जनतेच्या मनात.
सर्व्हेनुसार मध्यप्रदेशात कुणाला किती जागा मिळू शकतात? -
मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूम 230 जागा आहेत. यांपैकी भाजपला 106-118, काँग्रेसला 108-120, बीएसपीला 0-4 आणि इतरांनाही 0-4 एवढ्या जागा मिळू शकता. याच बरोबर व्होट शेअरचा विचार करता, भाजपला 44 टक्के, काँग्रेसला 44 टक्के, बीएसपीला 2 टक्के तर इतरांना 10 टक्के मते मिळू शकता.