मोदींना 'शूर्पणखे'चे वक्तव्य भोवणार? रेणुका चौधरी बदनामीचा खटला दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:01 AM2023-03-24T09:01:20+5:302023-03-24T09:02:08+5:30
7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते. त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या.
मोदी आडनावावरून टीका केल्याने राहुल गांधींना सुरतच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे आता काँग्रेस भडकली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देखील मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.
काँग्रेसच्या महिला नेता आणि माजी मंत्री रेणुका चौधरी शूर्पणखासोबतच्या तुलनेवरून मोदींविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार आहेत. २०१८ मध्ये मोदींनी त्यांच्या संबोधनावेळी रेणुका चौधरींचा हसतानाचा व्हायरल झालेल्या फोटोवरून त्यांच्या हसण्याची तुलना रावणाची बहीण शूर्पणखेशी केली होती. राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर आता चौधरी देखील मोदींवर खटला दाखल करणार आहेत.
चौधरी यांनी ट्विट करून याची माहिती देताना भाजपावर आणि न्यायालयावर टोला लगावला आहे. हे खालच्या पातळीवरील आहे. पंतप्रधान मोदींनी मला भर सभागृहात 'शूर्पणखा' म्हटले होते. पंतप्रधानांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आता ही जलद न्यायालये कशी कारवाई करतात ते पाहू, असे त्या म्हणाल्या.
काय घडले होते...
7 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत संबोधित करत होते. त्यावेळी रेणुका चौधरी एका गोष्टीवर मोठ्याने हसल्या होत्या. पंतप्रधानांनी तत्कालीन अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना संबोधून म्हटले की, अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, रेणुका जींना काहीही बोलू नका. आज रामायण मालिकेनंतर असे हास्य ऐकण्याचे सौभाग्य मिळाले.
This classless megalonaniac referred to me as Surpanakha on the floor of the house.
— Renuka Chowdhury (@RenukaCCongress) March 23, 2023
I will file a defamation case against him. Let's see how fast courts will act now.. pic.twitter.com/6T0hLdS4YW