राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:47 AM2023-05-13T11:47:45+5:302023-05-13T11:58:00+5:30

काँग्रेसच्या या आघाडीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Work to seal Rahul Gandhi's leadership from Karnataka begins; Reactions from Congress Leader Nana Patole | राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे.  बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस ११८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ७३ आणि जेडीएस २५ जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. 

काँग्रेसच्या या आघाडीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकाच्या जनतेने भाजपला दिली, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. देशातली लोकशाही संपवण्याचे काम भाजपा करत आहे. त्यामुळे हे बदलाचे वारे असून राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु झाल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तर अनपढ व्यवस्था देशातील सत्तेत बसलेली असून भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

बेळगावमध्येही काँग्रेसची मुसंडी, १४ जागांवर घेतली आघाडी; महाराष्ट्र एकीकरण समितीला अपयश

कर्नाटकमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.

मोदी-शाह यांना जनतेनं नाकारलं- खासदार संजय राऊत

कर्नाटकातून देशाची मन की बात बाहेर पडत आहे. कर्नाटकच्या जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाह यांनी झिडकारलं असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकमध्ये जे झालं तेच २०२४ ला देशात होईल असेही राऊत म्हणाले.  

Web Title: Work to seal Rahul Gandhi's leadership from Karnataka begins; Reactions from Congress Leader Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.