शेतकऱ्यांची भाजपकडून फसवणूक; बाळासाहेब थोरात यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:40 PM2019-07-25T23:40:19+5:302019-07-25T23:40:45+5:30
ऐरोलीत आढावा बैठक
नवी मुंबई : महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळ आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकºयांची अक्षरश: फसवणूक केली आहे. कर्जमाफीचा शेतकºयांना काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात शिवसेनेलाही या सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाव्यात, यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी ऐरोली येथील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात काँग्रेसची कोकण विभागनिहाय आढावा बैठक बोलाविण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून प्रत्येक विभागातील काँग्रेस पदाधिकाºयांसोबत बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित होते. इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची स्थिती यावर थोरात यांनी जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांशी चर्चा केली.