पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:28 PM2021-03-22T12:28:48+5:302021-03-22T12:29:55+5:30
यावेळी विरोधी नगरसेवक पीपीई किट घालून सभागृहात आले आणि त्यांनी भाजपचा निषेध करत गदारोळ केला.
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या सोमवार दि.22 रोजीच्या महासभेत विरोधकांनी गोंधळ घातला. पालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या मालमत्ता कराच्या गोंधळावरून सत्ताधारी काहीच बोलत नाही. ऑनलाईन सभेत विरोधकांना बोलू देत नाही, असा आरोप करत विरोधकांनी सभागृहात प्रवेश करीत सत्ताधारी भाजपचा निषेध केला.
यावेळी विरोधी नगरसेवक पीपीई किट घालून सभागृहात आले आणि त्यांनी भाजपचा निषेध करत गदारोळ केला. यामुळे महापौर डॉ कविता चौतमोल यांना सभा तहकूब करावी लागली. यावेळी, नगरसेवक सभागृहाबाहेर पडल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात येईल, असे चौतमोल यांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत गोंधळ, विरोधकांनी सभागृहात प्रवेश करत केला सत्ताधारी भाजपचा निषेध pic.twitter.com/GHbqQcn4U8
— Lokmat (@MiLOKMAT) March 22, 2021