उरणमध्ये काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:59 AM2023-12-29T11:59:33+5:302023-12-29T12:00:04+5:30

काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी एलन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी, आणि दिनशा वाचा यांनी केली.

Congress party's 138th anniversary celebrated in Uran with enthusiasm | उरणमध्ये काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

उरणमध्ये काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मधुकर ठाकूर 

उरण : रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात काँग्रेस कार्यालय येथे उरण तालुका व उरण शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्हयात सर्वच तालुक्यात रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवा असे आवाहन काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी केले.

काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी एलन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी, आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येवून २८ डिसेंबर १८८५ रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना  केली.स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजेच २६ डिसेंबर १९२० रोजी नागपूर मध्ये झालेल्या कॉग्रेसच्या अधिवेशनाने पक्षाला नवसंजिवनी मिळाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ मिळत गेले.काँग्रेस पक्षाच्या चळवळीने, काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेल्या काँग्रेस पक्ष,पक्षाचे विचार व कार्य, पक्षातील नेते, पदाधिकारी यांचे विचार व कार्य  येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे. इतिहासाचे सर्वांना स्मरण राहावे त्या अनुषंगाने भारतात काँग्रेसने वेगवेगळे उपक्रम राबवून आपला १३८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.  स्वातंत्र्य काळातील काँग्रेस पक्षाचे योगदान, पक्षाचे महत्व, कार्यकर्त्यांचे त्याग याबाबतीतही प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली.

माजी नगरसेवक बबन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देवीदास थळी , अमिना पटेल, चंदा मेवाती,भालचंद्र घरत, गुफरान तुंगेकर, दिलीप जाधव, हितेंद्र घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले.

Web Title: Congress party's 138th anniversary celebrated in Uran with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.