बेलापूर बलात्कार प्रकरणात फाशी ठोठावलेल्याची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:54 PM2021-11-26T12:54:14+5:302021-11-26T12:57:13+5:30
२०१२ मध्ये बेलापूरमधील दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या रहीमुद्दीन शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यापैकी एकीची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण या आरोपीची उच्च न्यायालयाने संशयाचा फायदा देत गुरुवारी सुटका केली.
२०१२ मध्ये बेलापूरमधील दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या रहीमुद्दीन शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती.
दोन महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करण्यात आली आणि दुसरीला गंभीर जखमी केले, असा सरकारी वकिलांचा आरोप आहे. मात्र, सरकारी वकील आरोपीची गुन्ह्यातील भूमिका सिद्ध करू शकले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने संशयाच्या फायद्यावर शेख याची सुटका केली. तसेच त्याच्यावरील सर्व आरोप हटविले.