मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:44 AM2023-04-17T07:44:56+5:302023-04-17T08:00:22+5:30

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

Former CM Uddhav Thackeray met the members who are undergoing treatment at MGM Hospital in Kamothe. | मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट

मृतांचा आकडा लपवला जातोय, अजित पवारांचा आरोप; उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट

googlenewsNext

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील ११ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. नागपूरमधील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपवून रात्री १.३० वाजताच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील होते. या तीघांनी रुग्णालयातील श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केली. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच  रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, खारघर येथील सोहळ्याची जय्यत तयारी महाराष्ट्र शासनाने केली होती. जवळपास ३५० एकर जागेवर काही लाख श्री सदस्य मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून दाखल झाले होते. या घटनेत जवळपास ३५० पेक्षा जास्त जणांना वेगवगेळ्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले आहे. 

Web Title: Former CM Uddhav Thackeray met the members who are undergoing treatment at MGM Hospital in Kamothe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.