नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे 'जवाब दो मोदीजी जवाब दो' आंदोलन

By योगेश पिंगळे | Published: April 18, 2023 04:47 PM2023-04-18T16:47:49+5:302023-04-18T16:49:59+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर जवाब दो मोदीजी, जवाब दो आंदोलन घेण्याचे निर्देश दिले होते.

'Jawab Do Modiji Jawab Do' movement of Navi Mumbai District Congress | नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे 'जवाब दो मोदीजी जवाब दो' आंदोलन

नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे 'जवाब दो मोदीजी जवाब दो' आंदोलन

googlenewsNext

नवी मुंबई :- भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मल्लिक यांनी पुलवामा घटनेतून मोदी सरकारची पोलखोल केल्यानंतर काँग्रेसने राज्यभरात जवाब दो मोदीजी ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून मंगळवारी वाशी येथे जवाब दो मोदीजी आशा घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले.

पुलवामा घटनेत सी.आर.पी.एफने हेलिकॉप्टर्सची केंद्र सरकारकडे मागणी केली. परंतु, गृहमंत्रालयाने हेलिकॉप्टर्स देण्यास नकार दिला. यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले. त्यात ४० जवानांचा नाहक बळी गेला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मल्लीक यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. एकंदरित, केंद्र सरकारची निती बघता पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यू ला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी देखील  मोदी हटाव देश बचाव,  'जवाब दो मोदीजी जवाब दो अशा घोषणा दिल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर जवाब दो मोदीजी, जवाब दो आंदोलन घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात मंगळवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, कामगार नेते  रवींद्र सावंत, तालुका अद्यक्ष सचिन नाईक, डॉ.मनोज उपाध्याय , अल्पंख्याक अद्यक्ष अन्वर हवालदार, बाबासाहेब गायकवाड, धोंडीराम पाटील, राजहंस भांबुरे, वॉर्ड अध्यक्ष जिल्हा कमिटी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: 'Jawab Do Modiji Jawab Do' movement of Navi Mumbai District Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.