पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:18 AM2018-09-11T02:18:40+5:302018-09-11T02:18:57+5:30
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात.
वैभव गायकर
पनवेल : गणेशोत्सवातकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. मात्र, रविवारी रात्रीपासून पनवेल बस आगारात कोकणात जाणाºया बसेसना डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने अनेक गाड्या पनवेल बस आगारात उभ्या आहेत.
स्थानिक परिसरात धावणाºया गाड्या सुरळीत सुरू असल्या तरी कोकणात जाणाºया गाड्यांची मोठी रांग पनवेल बस आगारात लागून राहिली आहे. रविवारी रात्रीपासून या बसना डिझेलचा पुरवठा होत नसल्याने ३० ते ४० गाड्या उभ्या होत्या. यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसने देशभरात भारत बंदचा आवाज दिला होता. त्यातच आगारात बसेसची मोठ्यात मोठी रांग लागली असल्याने या बसेस भारत बंदमुळे बंद ठेवण्यात आल्याची चर्चा या परिसरात रंगली होती. मात्र, इंधन पुरवठा न झाल्याने या बसेस जागेवर उभ्या असल्याचे सूत्रांच्या मार्फत सांगण्यात आले. विशेष म्हणजे वाहन सुरू असताना मध्यंतरी इंधन संपल्यास संबंधित वाहन चालकावर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न एसटी कर्मचाºयांकडून उपस्थित होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पनवेल आगारात डिझेलचे टँकर दाखल झाल्याने बस सुटण्यास काही प्रमाणात सुरु वात झाली.
पनवेलचे आगार प्रमुख विलास गावंड यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही परिस्थिती उद्भवली नसून कुर्ला आगारात पार्किंगची समस्या निर्माण झाल्यामुळे त्या गाड्या पनवेल डेपोमध्ये ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र डिझेलच्या पुरवठ्याअभावी ही समस्या उद्भवल्याचे समजते.