मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद मराठवाड्याला; अशोक डक यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:31 PM2020-08-31T15:31:11+5:302020-08-31T16:46:31+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अशोक डकांना संधी

Marathwada to be the Chairman of Mumbai APMC; Opportunity for Ashok Duck | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद मराठवाड्याला; अशोक डक यांना संधी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद मराठवाड्याला; अशोक डक यांना संधी

googlenewsNext

पुरूषोत्तम करवा

माजलगाव - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपद दुसऱ्यांदा मराठवाड्याला मिळाले असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांना संधी देत सभापतीपद बहाल केले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी झाली होती त्यात महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभापतीपदाची निवडणूक तब्बल सहा महिने लांबणीवर पडली होती. सभापतीपदाची निवडणूक सोमवारी दुपारी  झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक व माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची एकमताने निवड करण्यात आली. अशोक डक हे औरंगाबाद महसूल मधून निवडून आले होते. डक हे  सर्वात जास्त मतदान घेणारे उमेदवार ठरले होते. यापूर्वी मराठवाड्यातील परभणी येथील रामप्रसाद बोर्डीकर हे या बाजार समितीवर सभापती होते त्यानंतर अशोक डक यांना संधी मिळाली आहे.

Web Title: Marathwada to be the Chairman of Mumbai APMC; Opportunity for Ashok Duck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.