पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

By वैभव गायकर | Published: September 17, 2022 04:28 PM2022-09-17T16:28:13+5:302022-09-17T16:28:43+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवस  काँग्रेसच्या वतीने पनवेल येथे दि.17 रोजी बेरोजगारी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

prime minister narendra modi birthday is celebrated as unemployment day by congress | पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

Next

 वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क 

पनवेलदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवस  काँग्रेसच्या वतीने पनवेल येथे दि.17 रोजी बेरोजगारी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. पनवेल काँग्रेस भवन येथील रस्त्यावर राष्ट्रीय बेरोजगारी दिवस  केक कापून व पकोडे तळून साजरा करण्यात आला.

पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. मागील 8 वर्ष पंतप्रधान मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या मध्ये नोटबंदी, अस्थिर जीएसटी, कोविड मध्ये लावलेले उशिरा लॉकडाउन अशा अनेक निर्णयांमुळे बेरोजगारी व महागाई वाढली आहे असा आरोप यावेळी कॉग्रेसने केला.यावेळी युवक काँग्रेस सचिव विश्वजीत पाटील, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नौफील सय्यद व युवक काँग्रेसचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत मुंडक्कल,पंडित भोपी, प्रितेश साहू, राहुल सावंत, महासचिव अलका ठाकूर , प्रमोद पवार, अम्मार मदार, शहीद मुल्ला, नवीन पनवेल शहराध्यक्ष मर्फी म्हसकर, पनवेल शहर अध्यक्ष राकेश जाधव, तलोजा फेज 1 अध्यक्ष मोरेश्वर पाटील, व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: prime minister narendra modi birthday is celebrated as unemployment day by congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.