इलेक्ट्रॉल बाँडप्रकरणी युवक काँग्रेसची स्टेट बँकेविरोधात निदर्शने, बी.व्ही. श्रीनिवास यांची उपस्थिती
By नारायण जाधव | Published: March 7, 2024 07:27 PM2024-03-07T19:27:04+5:302024-03-07T19:27:59+5:30
Navi Mumbai: इलेक्ट्रॉल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिल्यानंतरही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ याबाबतची माहिती देण्यात जी दिरंगाई करीत आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी ऐरोली येथे तीव्र निदर्शने केली.
- नारायण जाधव
नवी मुंबई - इलेक्ट्रॉल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट निकाल दिल्यानंतरही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ याबाबतची माहिती देण्यात जी दिरंगाई करीत आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करून याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी ऐरोली येथे तीव्र निदर्शने केली. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत ऐरोली सेक्टर ८ येथील रीप्पेलझ मॉलजवळ ही निदर्शने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेचा निषेध करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
तत्पूर्वी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ लवकरच महाराष्ट्रात आगमन करणार आहे, त्याच्या पूर्व तयारीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत लक्ष्मी नारायण म्हात्रे हॉल, ऐरोली येथे सकाळी १० वाजल्यापासून ‘भारत जोडो न्याय यात्रा नियोजन बैठक’ आयोजिली होती. या बैठकीला नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, आयोजक युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यासह रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनवणे, रवींद्र सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.